
शिव समर्थ विद्यालय
फेब्रुवारी १९६२ ला “शिव समर्थ विद्यालय, प्राथमिक विभागास अनुदानित मराठी शाळा म्हणून मान्यता मिळाली. शैक्षणिक क्षेत्रातील हे संस्थेचे दुसरे पाऊल
विसाव्या शतकाचा प्रारंभ म्हणजेच क्रांतीचा उष:काल. याच कालखंडामध्ये इंग्रज सरकारने भारतीय नेत्यांवर अनन्वित अत्याचार केले. लोकमान्य टिळकांसारख्या महान देशभक्ताला तुरुंगवासाची शिक्षा तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा झाली.
अशा या सामाजिक परिस्थितीमध्ये ठाणे शहरांतील काही तरुणांना वाटू लागले की परमेश्वराची कृपा झाल्याशिवाय स्वातंत्र्य आणि यश प्राप्त होणार नाही. त्याच बरोबर ज्ञानोपासना, बलोपासना, तरुणांचे संघटन करणे ही काळाची गरज असल्याचे पटल्यामुळे अशी विचारसरणी असलेले काही मध्यम वर्गीय तरुण मंडळी एकत्र आली व त्यांनी दासनवमीचा उत्सव सन १९०५ मध्ये सुरु केला. परंतु ध्येयविहीन कार्यपद्धतीला काहीतरी संघटीतस्वरूप यावे अशी जिज्ञासा त्यांचे मनांत उत्पन्न झाली व आपल्या कार्याला एका संस्थेच्या चौकटीमध्ये बद्ध करण्यासाठी या तरुणांनी शनिवार, दि. १ जुलै १९१६ (आषाढ शुद्ध प्रतिपदा शके १८३८) रोजी श्री समर्थ सेवक मंडळ, ठाणे या संस्थेची स्थापना केली. संस्था स्थापन करण्यामध्ये सर्वश्री हरिभाऊ घाणेकर आणि नानासाहेब दामले यांचा प्रमुख भाग असला तरी गुरुवर्य वाघमास्तर, ग. ल. जोशी, कां. चिं. ब्रह्मे, गो. ना. आठवले, शं. ग. घाणेकर, कृ. ना. मोकाशी यांचा सहभाग होता. मंडळाचे ब्रीदवाक्य ‘मुख्य ते हरिकथा निरुपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण, सर्व विषयी…’ व मंडळाचे कार्य चालवण्याचे ध्येय या मंडळींनी ब्रीद्वाक्यानुसार निश्चित केले व भजनोपासना आणि आपल्या विविध उपक्रमांद्वारे लोककल्याणाचे कार्य व कार्यक्रम वर्षानुवर्षे सातत्याने चालविले आहेत. म्हणूनच मंडळाचे कार्य शुक्लेन्दुवत वाढत गेलेले आहे.

फेब्रुवारी १९६२ ला “शिव समर्थ विद्यालय, प्राथमिक विभागास अनुदानित मराठी शाळा म्हणून मान्यता मिळाली. शैक्षणिक क्षेत्रातील हे संस्थेचे दुसरे पाऊल
शिव समर्थ विद्यालयाची गंगोत्री म्हणजे शिशु ज्ञानवर्धन शाळा. चिमुकल्या बालकांवर सुसंस्कार करण्याचे आणि आदर्श नागरिकत्वाची पायाभरणी करण्याचे काम ही शाळा
सध्या पालकांचा त्यांच्या मुलांना इंग्रजी शाळेत पाठविण्याच्या कल वाढला आहे. इंग्रजी माध्यम शाळेची सुरूवात मराठी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा कमी होणारा
समर्थ रामदास स्वामींच्या शिकवणुकीतील बलोपासना हे तर श्री समर्थ सेवक मंडळाचे मुख्य ध्येय. सुदृढ शरीर आणि सशक्त मन घडविण्यासाठी १९२५
श्री समर्थ सेवक मंडळाने आपल्या उपक्रमांमध्ये, पुरुषांच्या बरोबरीने महिलांना नेहमी सामावून घेतले. हनुमान व्यायाम शाळेच्या पटांगणापासून ते समर्थ संजीवनी विहिरीतील
श्री समर्थ सेवक मंडळाच्या उपक्रमांपैकी गेली ४७ वर्षे सातत्याने सुरू असलेला आणि युवावर्गातील वक्ते घडवणारा उपक्रम म्हणजे कै. नी. गो.
१. कै. बा गं. खेर
२. कै. सुभाषचंद्र बोस
३. कै. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर
४. कै. शंकर श्री. देव
५. कै. ल. ब. भोपटकर
६. कै. मंगळदास पक्वासा
७. कै. ग. वा. मावळंकर
८. कै. न. वि. गाडगीळ
९. कै. ना. सी. फडके
१०. कै. वि. स. खांडेकर.
११. कै. विठ्ठलराव घाटे
१२. कै. अनंत काणेकर
१३. कै. पां. वा. गाडगीळ
१४. कै. स. का. पाटील
१५. कै. सेनापती बापट
१६. पै. शेख अद्दुल्ला
१७. कै. मास्टर विनायक
१८. कै. क्रांतिवीर नाना पाटील
१९. कै. संत गाडगे महाराज
२०. कै. यशवंतराव चव्हाण
२१. कै. बाळासाहेब देसाई
२२. कै. वि. स. पागे
२३. कै. ताई फडके
२४. कै. मो. शं. रांगणेकर
२५. कै. शेषराव वानखेडे
२६. कै. संत तुकडोजी महाराज
२७. श्री. मोरारजी देसाई
२८. श्री. जयराम शिलेदार
२९. सौ. जयमाला शिलेदार
३०. श्री. पी. सावळाराम
३१. श्री. सतीश प्रधान
३२. श्री. रा. कृ. देवळे
३३. माधव मंत्री
३४. श्री. श्री. भि. वेलणकर
३५. श्रीमती अनुताई वाघ
३६. श्री. दत्ताजी ताम्हणे
३७. श्री. का. बा. सहस्त्रबुद्धे
३८. न्यायमूर्ती विजय टिपणीस
३९. डॉ. प्र. शं. भागवत
४०. श्रीमती विमलाताई रांगणेकर
४१. श्री. प्रभाकर हळदणकर
४२. श्री. भगवानराव पटवर्धन
४३. डॉ. सौ. कुसुम वि. दामले
४४. श्री. गणपतराव कजबजे
४५. डॉ. वि. भा. दामले
४६. डॉ. सौ. शकुंतला घीवाला
४७. श्री. वसंतराव डावखरे
४८. श्री. मोहन गुप्ते
४९. श्री. श्रीनिवास वा. ओक
५०. डॉ. ग. दि. आचार्य
५१. डॉ. ह. शा. भानुशाली
५२. डॉ. म. ग. हजिरनीस
अशा अनेक मान्यवर व्यक्तींनी संस्थेस भेट दिली व संस्थेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले होते.
प्रमुख कार्यालय
समर्थ मंदीर, बहिरामजी भिकाजी रस्ता
चिंतामणी ज्वेलर्स जवळ,
जांभळी नका, ठाणे (प) 400601
फोन करा : +91 1234 567 890
ई-मेल करा : ssmthane@gmail.com