शंभर वर्षाची वाटचाल करणाऱ्या श्री समर्थ सेवक मंडळातर्फे भाविकपणे आणि निष्ठेने श्रीमत् दासनवमी उत्सव साजरा केला जातो. गेली ११३ वर्षे हा उत्सव ठाण्यात साजरा होत आहे.
माघ वद्य प्रतिपदा ते माघ वद्य नवमी उत्सवाच्या नऊ दिवसांची कार्यपद्धती सज्जन गडावर ज्याप्रमाणे असते त्यानुसार कमी-अधिक
करण्याचा आमचा प्रयत्न असतो. पहिल्या दिवशी प्रभात फेरीने उत्सवाचा प्रारंभ होतो. मंडळाचे सभासद, हितचिंतक, शालेय विद्यार्थी, शिक्षक यांचा समावेश यात असतो. मनाचे श्लोक, समर्थांचा गजर, चौपदी, अभंग म्हणत उत्सवाची वातावरण निर्मिती होते. आजूबाजूच्या परिसरांतील लोकांमध्ये जागृती निर्माण करणं हा उद्देश यामध्ये असतो. श्री समर्थ पादुका व श्री समर्थांच्या मुर्तीची षोडषोपचारे पूजा केली जाते. दररोज पहाटे काकड आरती, सामुदायिकपणे श्रीदासबोधाचे पठण, दुपारी नैवेद्य, दुपारच्या कार्यक्रमात आध्यात्मिक कार्यक्रमांवर अधिक भर असतो. सायंकाळी मारूती स्तोत्रे, करुणाष्टके, सवाया, आरती, मंत्रपुष्पांजली, प्रसाद आणि नंतर श्री समर्थ सांप्रदायिक पद्धतीनुसार (पंचपदी, विविध अभंग – उपसंहार) भजन होते. त्यानंतर सायंकाळचे लौकिक कार्यक्रम असं ढोबळ मानानं दैनंदिन कार्यक्रमाचं स्वरूप असतं. करुणाष्टके, सवाया, चौपदी इत्यादींसाठी ‘उपासना मार्ग प्रदीप’ यामधील आवश्यक व निवडक गोष्टींचा अंतर्भाव असलेली ‘भक्ती सोपान’ ही नानांची संग्रहित केलेली पुस्तिका आपण वापरतो. आवर्जून सांगावेसे वाटते की या पुस्तिकेचं सर्वांनी पठण, चिंतन आणि मनन जरूर करावं. नऊ दिवसात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विद्यार्थी व गणेशभक्त यांच्या सहभागाने सामुदायिक सहस्रावर्तने होतात. एक दिवस गीता मंडळ व गीता प्रेमी यांचे तर्फे सामुदायिक गीता पठणाचा कार्यक्रम होतो. नवमीच्या दिवशी डॉ. शांताराम आपटे संचालित सुरवाणी ज्ञानमंदिर शिष्या वर्ग व रुद्र मंडळ, ठाणे यांचे संयुक्त विद्यमाने लघुरुद्राभिषेक संपन्न होत असतो. नवमीच्या दिवशी महाप्रसाद, सायंकाळी श्री समर्थांची पालखी व रात्रौ लळिताचे भजन यांनी उत्सव समाप्ती होत असते. लळिताचे अभंग नानासाहेब दामले यांनी रचले आहेत. पालखी सोहळ्याला विद्याथ्यांची उपस्थिती असते. पालखीच्या वेळी समर्थ भक्त मंडळी अभंग, गजर, श्लोक इत्यादीचं पठण करून आनंद घेत असतात.
भक्तीसोपान पुस्तिकेमध्ये विविध मारुती स्तोत्रे, करुणाष्टके, पारंपरिक अन्य देवतांच्या तसचे वारांच्या सवाया, विविध आरत्या त्यांचा
परिश्रम, प्रबोधन या त्यांच्या शिकवणीनुसार मंडळाचे कार्य चालू आहेच.