श्रीमत् दासनवमी उत्सवांतील कार्यक्रमाचा एक भाग या दृष्टीने उत्सवाच्या नऊ दिवसांत याचं आयोजन केलं जात असे. हल्ली उत्सवाचे आधी त्या आयोजित केल्या जातात. यासाठी समितीचे गठण करण्यात येते. या स्पर्धेची देखील मार्गदर्शक तत्त्वे, नियमावली तयार केली जाते. वयोमयदिनुसार स्पर्धकाचे गट केले जातात. प्राथमिक फेरी व अंतिम फेरी असं या स्पर्धेचं स्वरूप असून दोन दिवसांत ती आयोजित केली जाते. प्राथमिक व अंतिम फेरीमधील विजयी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र व बक्षिसे प्रदान केली जातात. साथीदारांची साथ हवी असल्यास समितिमार्फत केली जाते. दिवसेंदिवस स्पर्धकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धेने स्वतःचं स्थान निर्माण करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे.