सध्या पालकांचा त्यांच्या मुलांना इंग्रजी शाळेत पाठविण्याच्या कल वाढला आहे. इंग्रजी माध्यम शाळेची सुरूवात मराठी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा कमी होणारा पट, पालकांची मानसिकता या सर्वांचा विचार करून व काळाची गरज ओळखून त्या दृष्टीने मंडळाने शिव समर्थ इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याचे ठरविले व त्याप्रमाणे नर्सरी व ज्युनिअर केजीची शाळा सन २०१५ पासून सुरू केली.
ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात संस्थेचे भव्य क्रीडांगण आहे. त्याठिकाणी क्रीडा संकूलाच्या धर्तीवर निम्नॅस्टीक कराटे, योगा, मल्लखांब, खो- खो, बास्केटबॉल, लंगडी, अॅथलेटिस्, भारतीय व विदेशी खेळांचे प्रशिक्षण देऊन उत्तम खेळाडू निर्माण करणारी संस्था म्हणून संस्थेचा नावलौकीक वाढविण्याचा निष्ठापूर्वक प्रयत्न करण्यात येणार आहे.